चैत्यभूमीवर उसळला जनसागर

मुंबई, ६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीत महापरिनिर्वाण झाले अर्थात निधन झाले. मुंबईत दादर येथे ७ डिसेंबर १९५६ रोजी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता. ही […]

चैत्यभूमीवर उसळला जनसागर

मुंबई, ६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीत महापरिनिर्वाण झाले अर्थात निधन झाले. मुंबईत दादर येथे ७ डिसेंबर १९५६ रोजी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता. ही घटना जिथे घडली त्या जागेला दीक्षाभूमी या नावाने ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण म्हणून दरवर्षी ६ डिसेंबर या दिवशी महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने मुंबईत चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय चैत्यभूमीवर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींचे दर्शन घेतले. तर काही नेत्यांनी नागपूर येथे दीक्षाभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींचे दर्शन घेतले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी मेणबत्ती मोर्चा काढून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कलाकारांनी रांगोळी, चित्र अशा विविध माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर साकारून महामानवाला विनम्र अभिवादन केले. कोणी मेणबत्तीवर तर कोणी दहा रुपयांच्या नाण्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर साकारून महामानवाला विनम्र अभिवादन केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number