एका तासाचा प्रवास वीस मिनिटांत

मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शिवडी-न्हावा शेवा पारबंदर मार्ग… तब्बल २२ किलोमीटर लांबीचा रस्ता… भारतातील सर्वात मोठा सागरी पूल… या पुलामुळे एका तासाचा प्रवास वीस मिनिटांत पूर्ण करता येणार. दक्षिण मुंबईतून थेट रायगड जिल्ह्यात अवघ्या वीस मिनिटांत पोहोचता येणार आहे. या पुलामुळे दक्षिण मुंबईतून मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेत किमान अर्ध्या […]

एका तासाचा प्रवास वीस मिनिटांत

मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शिवडी-न्हावा शेवा पारबंदर मार्ग… तब्बल २२ किलोमीटर लांबीचा रस्ता… भारतातील सर्वात मोठा सागरी पूल… या पुलामुळे एका तासाचा प्रवास वीस मिनिटांत पूर्ण करता येणार. दक्षिण मुंबईतून थेट रायगड जिल्ह्यात अवघ्या वीस मिनिटांत पोहोचता येणार आहे. या पुलामुळे दक्षिण मुंबईतून मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेत किमान अर्ध्या तासाची बचत होणार आहे. पारबंदर मार्गामुळे नैना (न्यू एअरपोर्ट इन्फ्लुएंस नोटिफाइड एरिया) परिसरात तसेच पनवेल पालिकेच्या हद्दीत असलेल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणे सोपे होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पुणे या शहरांमध्ये रस्त्यावरून पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेत पारबंदर मार्गामुळे बचत होणार आहे. विकासाला चालना देणाऱ्या या रस्त्याचे उद्घाटन आधी २५ डिसेंबर २०२३ रोजी होणार होते. पण तांत्रिक कामांसाठी होत असलेल्या विलंबामुळे शिवडी-न्हावा शेवा पारबंदर मार्गाचे उद्घाटन जानेवारी २०२४ मध्ये होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्रकल्प जानेवारी २०२४ च्या अखेरीस सुरू होईल, असे सूतोवाच देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number