मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. याआधी दीर्घ काळ उद्धव गटाचे आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचे अध्यक्ष होते.
मुंबईकर, सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी, उद्योगपती यांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासासाठी नव्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिद्धिविनायक न्यासावर महाराष्ट्र शासनाचे नियंत्रण आहे. यामुळे राज्य शासनाने सिद्धिविनायक न्यासावर नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली आहे.
कोण आहेत आमदार सदा सरवणकर ?
सदा सरवणकर हे माहीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार आहेत. सदानंद शंकर सरवणकर मराठी राजकारणी आहेत. ते माहीम मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले आहेत.
महत्त्वाचे :
सदा सरवणकर सिद्धिविनायक मंदिराचे नवे अध्यक्ष
सदा सरवणकर माहीम विधानसभेचे शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार
आधी उद्धव गटाचे आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष