‘माझी बाजू ऐकून घ्या’

मुंबई, १८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एक मोठी बातमी आली आहे. उद्धव गटाचे आमदार आदित्य उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. निर्णय देण्याआधी माझी बाजू ऐकून घ्यावी अशी विनंती करणारी कॅव्हेट आदित्य ठाकरे यांनी न्यायालयात सादर केली. दिशाचा मृत्यू ८ जून २०२० तर सुशांतसिंहचा मृत्यू १४ जून […]

‘माझी बाजू ऐकून घ्या’

मुंबई, १८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एक मोठी बातमी आली आहे. उद्धव गटाचे आमदार आदित्य उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. निर्णय देण्याआधी माझी बाजू ऐकून घ्यावी अशी विनंती करणारी कॅव्हेट आदित्य ठाकरे यांनी न्यायालयात सादर केली.

दिशाचा मृत्यू ८ जून २०२० तर सुशांतसिंहचा मृत्यू १४ जून २०२० रोजी झाला. दोघांचा मृत्यू ही आत्महत्या आहे की हत्या यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली. मुंबई पोलीस तसेच केंद्रीय तपास यंत्रणांनी या दोन्ही प्रकरणांचा तपास केला. आता आदित्य ठाकरे यांच्या कॅन्हेटमुळे पुन्हा एकदा दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे पुढे काय होणार यावरून सोशल मीडियात चर्चेला उधाण आले आहे. नव्याने जस्टिस फॉर सुशांत आणि जस्टिस फॉर दिशा असे हॅशटॅग ट्रेंड होण्यास सुरुवात झाली आहे.

काय आहे याचिका?

८ जून २०२० रोजीचे दिशा सालियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे मोबाईल लोकेशन तपासले जावे. तसेच १३ आणि १४ जून २०२० रोजीचे सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाझ खान, संदीप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. तसेच या दोन्ही दिवसांचे आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सारे सीसीटीव्ही फुटेज तपासले जावे. सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात ४४ वेळा फोनवर काय बोलणं झालं? याची चौकशी व्हायला हवी. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी. ही मागणी करणारी याचिका राशिद खान पठाण यांनी दाखल केली आहे. याच याचिकेप्रकरणी ‘बाजू ऐकून घ्या’, अशी विनंती करणारी कॅव्हेट आदित्य ठाकरे यांनी न्यायालयात केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number