नवाब मलिक यांना दिलासा…

मुंबई, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : सुप्रिया गटाचे आमदार नवाब मलिक यांच्या जामिनाच्या मुदतीत तीन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही मुदतवाढ दिली आहे. आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रदीर्घ काळानंतर नवाब मलिक यांना तब्येतीच्या कारणास्तव हंगामी जामीन देण्यात आला होता. या मुदतीत सर्वोच्च न्यायालयाने वाढ केली आहे. […]

नवाब मलिक यांना दिलासा…

मुंबई, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : सुप्रिया गटाचे आमदार नवाब मलिक यांच्या जामिनाच्या मुदतीत तीन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही मुदतवाढ दिली आहे. आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रदीर्घ काळानंतर नवाब मलिक यांना तब्येतीच्या कारणास्तव हंगामी जामीन देण्यात आला होता. या मुदतीत सर्वोच्च न्यायालयाने वाढ केली आहे.

नवाब मलिक यांना आधी तब्येतीच्या कारणास्तव दोन महिन्यांचा हंगामी जामीन दिला होता. या मुदतीत सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यांची वाढ केली.

नवाब मलिक यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही. आम्ही ताजे रिपोर्ट सादर करत आहोत त्यामुळे त्यांना अंतिम जामीन देण्यात यावा असे त्यांच्या वकिलांनी सांगितले तसेच त्यांची किडनी अजूनही योग्य पद्धतीने काम करत नसल्याने वैद्यकीय कारण लक्षात घेता त्यांना जामीन द्यावा अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. ही मागणी मान्य झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number