‘नमो शेतकरी महासन्मान’च्या पहिल्या हप्त्याला मंजुरी

मुंबई, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेसाठी एक हजार ७२० कोटी रुपयांच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळणार आहेत. लवकरच […]

‘नमो शेतकरी महासन्मान’च्या पहिल्या हप्त्याला मंजुरी

मुंबई, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेसाठी एक हजार ७२० कोटी रुपयांच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळणार आहेत. लवकरच एप्रिल ते जुलै २०२३ कालावधीसाठीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

सध्या केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ या योजनेत शेतकऱ्याला वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळतात. राज्याच्या योजनेमुळे पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी आणखी सहा हजार रुपये मिळणार आहेत. थोडक्यात शेतकऱ्याला केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण १२ हजार रुपये मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number