नांदेडच्या घटनेची उच्च न्यायालयाने घेतली दखल

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्णांचे मृत्यू झाले. या घटनेची मुंबईच्या उच्च न्यायालयाने घेतली. उच्च न्यायालयाने या प्रकरणात राज्य शासनाच्या वकिलाची कानउघाडणी केली. डॉक्टरांची कमतरता, औषधांची टंचाई अशा गोष्टीमुळे मृत्यू होत असतील तर अजिबात खपवून घेतले जाऊ शकत नाही, या शब्दात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. औरंगाबाद जिल्हा आणि शहराचे […]

नांदेडच्या घटनेची उच्च न्यायालयाने घेतली दखल

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्णांचे मृत्यू झाले. या घटनेची मुंबईच्या उच्च न्यायालयाने घेतली. उच्च न्यायालयाने या प्रकरणात राज्य शासनाच्या वकिलाची कानउघाडणी केली. डॉक्टरांची कमतरता, औषधांची टंचाई अशा गोष्टीमुळे मृत्यू होत असतील तर अजिबात खपवून घेतले जाऊ शकत नाही, या शब्दात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

औरंगाबाद जिल्हा आणि शहराचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्हा आणि शहराचे नामांतर धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयांना अनेक याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले आहे. या याचिकांवरील सुनावणीसाठी महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ हे न्यायालयात आले होते. महाधिवक्ता हजर होताच उच्च न्यायालयाने नांदेडच्या घटनेचा उल्लेख केला आणि त्यावरून कानउघाडणी केली.

डॉक्टरांची कमतरता, औषधांची टंचाई त्यामुळे असे मृत्यू होत असतील तर अजिबात खपवून घेतले जाऊ शकत नाही, असे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांना सांगितले. त्यावर नेमकी घटना काय आणि कशी घडली, या साऱ्याची माहिती घेतो आणि गुरुवारी प्राथमिक म्हणणे मांडतो, असे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी सांगितले. शुक्रवारी याप्रश्नी प्राधान्याने सुनावणी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number