शिंदेंची ताकद वाढली, मुंबईचे ३५ माजी नगरसेवक शिवसेनेत

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद दिवसागणिक वाढत आहे. चांदीवलीतील माजी नगरसेविका लीना शुक्ला आणि माजी नगरसेवक हरीश शुक्ला यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल झालेल्या मुंबईच्या माजी नगरसेवकांची संख्या ३५ झाली आहे. मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत निवडून आलेले हे ३५ माजी नगरसेवक शिवसेनेत […]

शिंदेंची ताकद वाढली, मुंबईचे ३५ माजी नगरसेवक शिवसेनेत

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद दिवसागणिक वाढत आहे. चांदीवलीतील माजी नगरसेविका लीना शुक्ला आणि माजी नगरसेवक हरीश शुक्ला यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल झालेल्या मुंबईच्या माजी नगरसेवकांची संख्या ३५ झाली आहे. मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत निवडून आलेले हे ३५ माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्यामुळे मुंबईतले पक्षाचे राजकीय महत्त्व वाढले आहे.

लीना शुक्ला आणि हरीश शुक्ला यांच्यासोबतच काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष माया खोत आणि उपाध्यक्ष जया नाडर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचे लीना शुक्ला यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number