अंडरग्राऊंड मेट्रोत नेटवर्क फुल्ल राहणार

कुलाबा – वांद्रे – सीप्झ म्हणजे आरे ते कफ परेड या भूमिगत मेट्रो मार्गिकेतून प्रवास करणाऱ्यांना विनाअडथळा मोबाइल नेटवर्क उपलब्ध व्हावे, यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी जमिनीखाली २० मीटर खोलीपर्यंत अँटेना बसविले जाणार आहेत. या मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे. मेट्रो ३ ही राज्यातील पहिली भूमिगत मेट्रो […]

अंडरग्राऊंड मेट्रोत नेटवर्क फुल्ल राहणार

कुलाबा – वांद्रे – सीप्झ म्हणजे आरे ते कफ परेड या भूमिगत मेट्रो मार्गिकेतून प्रवास करणाऱ्यांना विनाअडथळा मोबाइल नेटवर्क उपलब्ध व्हावे, यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी जमिनीखाली २० मीटर खोलीपर्यंत अँटेना बसविले जाणार आहेत. या मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे.

मेट्रो ३ ही राज्यातील पहिली भूमिगत मेट्रो मार्गिका आहे. मार्गिकेचा पहिला टप्पा आरे ते बीकेसी असा असेल. या मार्गिकेतील तिकीट खिडक्या जमिनीच्या खाली १०.१४ मीटर तर प्रत्यक्ष स्थानकांचे फलाट हे जमिनीच्या खाली १८ ते २० मीटर खोलीवर आहेत. त्यामुळे भुयारी मार्गात मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा उपलब्ध करणे, हे या मार्गिका उभी करणाऱ्या प्रकल्पातील एक महत्त्वाचे आव्हान होते. यासाठीच ही मार्गिका उभ्या करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) सौदी अरेबियाच्या कंपनीशी करार केला आहे.

जमिनीखालून प्रवास करताना मोबाइल तसेच इंटरनेट वापरता यावे, यासाठी ‘एमएमआरसी’ने सौदी अरेबियामधील रियाध शहरातील ‘एसेस’ या कंपनीच्या एसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीला निविदा प्रक्रियाद्वारे कंत्राट दिले आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना विनाअडथळा मोबाइल आणि इंटरनेट सेवा सुनिश्चित करण्यासाठी कंपनीने खासगी मोबाइल सेवा कंपन्यांकडून सेल्युलर कव्हरेज उपलब्ध करण्याची योजना आखली आहे. या खासगी कंपन्यांसाठी एसेस इंडिया ही कंपनी भुयारी मार्गातील स्थानके आणि बोगद्यांमध्ये अँटेना आणि रिपिटर्स बसविणार आहे. यामुळे मेट्रो ३ मार्गिकेवरील मेट्रो जरी भूमिगत असली तरी प्रवाशांना मोबाइल आणि इंटरनेट सेवा वापरता येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number