पश्चिम रेल्वेच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी विशेष लोकल

मुंबई, २२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या संख्येने गणेशभक्त बाहेर पडतात. मुंबईत विसर्जन मार्गावर जाऊन बाप्पाचे दर्शन घेतात. रात्री उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी परतात. या भाविकांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आठ विशेष लोकल सोडणार आहे. गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी पहाटे चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट या […]

पश्चिम रेल्वेच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी विशेष लोकल

मुंबई, २२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या संख्येने गणेशभक्त बाहेर पडतात. मुंबईत विसर्जन मार्गावर जाऊन बाप्पाचे दर्शन घेतात. रात्री उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी परतात. या भाविकांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आठ विशेष लोकल सोडणार आहे. गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी पहाटे चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट या मार्गावर विशेष धीम्या लोकल उपलब्ध असतील.

अनंत चतुर्दशी : गुरुवार २८ सप्टेंबर २०२३
पश्चिम रेल्वेच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी विशेष लोकल
चर्चगेट ते विरार : गुरुवारी मध्यरात्रीनंतर १.१५, १.५५, २.२५ आणि शुक्रवारी पहाटे ३.२०
विरार ते चर्चगेट : गुरुवारी मध्यरात्रीनंतर १२.१५, १२.४५, १.४० आणि शुक्रवारी पहाटे ३

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number