राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना, आमदारांचे काय होणार ?

मुंबई, २१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना झाले आहेत. लवकरच राज्यातील सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या निर्णयाबाबत दिरंगाई होत असल्याचे निरीक्षण नोंदवत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीत कोणाला भेटणार आणि […]

राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना, आमदारांचे काय होणार ?

मुंबई, २१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना झाले आहेत. लवकरच राज्यातील सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या निर्णयाबाबत दिरंगाई होत असल्याचे निरीक्षण नोंदवत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीत कोणाला भेटणार आणि काय चर्चा करणार यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

काय म्हणाले राहुल नार्वेकर ?

दिल्लीला रवाना होताना विमानतळावर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी बातचीत केली. आमदारांच्या अपात्रेबाबतचा निर्णय कायद्याच्या चौकटीत राहून घेतला जाईल, असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number