मुंबई – ठाण्यासह महाराष्ट्रात दहीहंडी उत्साहात साजरी, मानाच्या २ हंड्या फुटल्या

मुंबई : मुंबई : मुंबई – ठाण्यासह महाराष्ट्रात दहीहंडी उत्साहात साजरी झाली. आतापर्यंत मानाच्या तीन हंड्या फुटल्या आहेत. बोरीवलीतील मानाची मागाठाणे येथील तारामती चॅरिटेबल ट्रस्टची दहीहंडी फुटली. प्रकाश सुर्वे हे या दहीहंडीचे मुख्य आयोजक होते. मागाठाणेची दहीहंडी बोरीवलीच्या गजानन मंडळाने आठ थर रचून फोडली. दहीहंडी फोडणाऱ्या गजानन मंडळाला आयोजकांनी ५५ लाख रुपयांचे बक्षिस दिले. दहीहंडी […]

मुंबई – ठाण्यासह महाराष्ट्रात दहीहंडी उत्साहात साजरी, मानाच्या २ हंड्या फुटल्या

मुंबई : मुंबई : मुंबई – ठाण्यासह महाराष्ट्रात दहीहंडी उत्साहात साजरी झाली. आतापर्यंत मानाच्या तीन हंड्या फुटल्या आहेत.

बोरीवलीतील मानाची मागाठाणे येथील तारामती चॅरिटेबल ट्रस्टची दहीहंडी फुटली. प्रकाश सुर्वे हे या दहीहंडीचे मुख्य आयोजक होते. मागाठाणेची दहीहंडी बोरीवलीच्या गजानन मंडळाने आठ थर रचून फोडली. दहीहंडी फोडणाऱ्या गजानन मंडळाला आयोजकांनी ५५ लाख रुपयांचे बक्षिस दिले. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांना आयोजकांनी उत्सवाच्या ठिकाणीच बक्षिस देऊन त्यांचे जाहीर कौतुक केले.

ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी पण फुटली. रवींद्र फाटक हे या दहीहंडीचे मुख्य आयोजक होते. शिवसाई गोविंदा पथकाने नऊ थर रचून ही हंडी फोडली. राजन विचारे मुख्य आयोजक असलेली ठाण्याच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टची दहीहंडी फुटली. शिवाजी पाटील मुख्य आयोजक असलेली ठाण्याच्या स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी फुटली. वडाळ्याच्या यश गोविंदा पथकाने नऊ थर रचून ही हंडी फोडली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number