मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवलीतील मागाठाणे तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे , राज प्रकाश सुर्वे याच्या वतीने भव्य दिव्य दहीकाला आयोजन करण्यात आले आहे याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार याठिकाणी उपस्थित राहणार आहे.तसेच या ठिकाणी मराठी आणि हिंदी कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी कार्यक्रमात सुप्रसिद्ध मराठी कलाकार गौतमी पाटील यांची उपस्थिती पण असणार आहे. गौतमी पाटील यांचा पहिल्यांदा मुंबई मध्ये कार्यक्रम होणार आहे…