बदला घेण्यासाठी महिलेने कुत्र्यावर फेकले अ‍ॅसिड

मुंबई, १८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबईतील मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात एक धक्कादायक घटना असून एका महिलेने इमारतीतील एका कुत्र्यावर अ‍ॅसिड फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या मांजरीसोबत कुत्रा खेळतो म्हणून हे कृत्य करण्यात आले असून महिलेचे हे कृत्य इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मालाड पश्चिमेकडील मालवणी गायकवाड नगर परिसरात १६ ऑगस्ट च्या […]

बदला घेण्यासाठी महिलेने कुत्र्यावर फेकले अ‍ॅसिड

मुंबई, १८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबईतील मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात एक धक्कादायक घटना असून एका महिलेने इमारतीतील एका कुत्र्यावर अ‍ॅसिड फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या मांजरीसोबत कुत्रा खेळतो म्हणून हे कृत्य करण्यात आले असून महिलेचे हे कृत्य इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

मालाड पश्चिमेकडील मालवणी गायकवाड नगर परिसरात १६ ऑगस्ट च्या दुपारी शबीस्ता सुहेल अन्सारी यांच्या मांजराबरोबर ब्राउनी नावाचा श्वान इमारतीच्या गेट जवळ खेळत होता. मांजर आणि श्वान यांची मस्ती चालू असताना श्वान त्या मांजरीच्या मागे देखील लागायचा मात्र हे शबिस्ता अन्सारी हिला आवडले नाही. त्यानंतर तिने इमारतीत जात घरातून अ‍ॅसिड आणले आणि ब्राउनी या श्वानावर अ‍ॅसिड हल्ला केला. या अ‍ॅसिड हल्ल्यात श्वानाला गंभीर इजा झाली असून त्याच्या डोळ्याला देखील जखम झाली आहे. हल्ल्यानंतर श्वान किंकाळताना दिसत असून या क्रूर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यानंतर मालवणी पोलिसांनी याप्रकरणी प्राणी क्रूरता कायदा ४२९, ११९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मालवणी पोलीस करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number