बॉलिवूडचा ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन शूटिंग सेटवर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ८० व्या वर्षीही अमिताभ स्वत: अॅक्शन सीन्स देतात. अमिताभ बच्चन आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ च्या शूटिंगसाठी हैदराबादला गेले होते. या चित्रपटासाठीच्या एका अॅक्शन सीन्स दरम्यान त्यांना बरगड्यांना दुखापत झाली आहे. ते मुंबईच्या आपल्या घरी परतले असून त्यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे.
अमिताभ बच्चन यांना शूटिंग सेटवर दुखापत होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी ही त्यांनी अनेकदा अशा संकटाचा सामना केला आहे. यातून सावरुन ते पुन्हा जोमाने कामावर परतल्याचेही पाहायला मिळाले. आजपासून जवळजवळ ४० वर्षांपूर्वी असाच एक अॅक्शन सीन करताना बिग बी मृत्यूच्या दाढेत गेले होते. पण प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर ते बरे झाले होते.
‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी बिग बींना मोठी दुखापत झाली होती. यावेळी संपूर्ण बॉलिवूड हादरले होते. या घटनेनंतर अमिताभ बच्चन जवळपास २ महिने रुग्णालयात होते. २६ जुलै १९८२ मध्ये त्यांना ही दुखापत झाली होती. सुरुवातीला काळात ही दुखापत फार किरकोळ आहे, असाच समज होता. पण काही दिवसांनी अमिताभ यांची तब्येत ढासळली. ते कोमातही होते. या अपघातानंतर त्यांने नवे आयुष्यच मिळालं, होते.
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमधून अपघातासंदर्भातील माहिती शेअर केली आहे. त्यांनी लिहिलंय की, “हैदराबादमध्ये मी ‘प्रोजेक्ट के’ चं शूटिंग करत होतो. एक अॅक्शन सीन होता आणि तो सीन शूट करताना दुखापत झाली. उजव्या बाजुच्याबरगड्यांमधील स्नायुंना इजा झाली आहे. त्यामुळे शुटिंग रद्द करण्याची वेळ आली.” असा उल्लेख अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये केला आहे.