‘ताफ्यातील हल्ल्यामागे शिंदे गटाचा हात’

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरु आहे. मंगळवारी ते औरंगाबाद जिल्ह्यातील महालगावात त्यांचा सभा होते. दरम्यान, त्याच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.सभा संपल्यावर पुन्हा एकदा आदित्य यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचेही समोर आले आहे. […]

‘ताफ्यातील हल्ल्यामागे शिंदे गटाचा हात’

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरु आहे. मंगळवारी ते औरंगाबाद जिल्ह्यातील महालगावात त्यांचा सभा होते. दरम्यान, त्याच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.सभा संपल्यावर पुन्हा एकदा आदित्य यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचेही समोर आले आहे. त्याशिवाय काही लोकांनी पपईचे तुकडे त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर फेकल्याचं समोर आले आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ताफ्यातील हल्ल्यामागे शिंदे गटाचा हात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले.”औरंगाबादमधील आमची सभा हिट झाली. मात्र काही अज्ञात लोकं होती त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी शिवसंवाद सभेत शेतकरी बांधवांसोबत बोलत आहोत, जनतेचे प्रश्न ऐकून घेत आहे, त्यांची निवेदनं घेत आहे. ही लढाई देशातील संविधान आणि लोकशाहीसाठी आहे एका पक्षासाठी नाही. आमच्या सभा चालू राहतात. काल छोटी बाचाबाची झाली असेल मागे ते ठीक आहे. कदाचित हे गद्दारांच्या गटाने केलं असेल, ठीक आहे. ज्यांच्याकडे गर्दी नाही होत ते इथे लोकं पाठवत असतात,” असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number