मुश्रीफांवर ईडीचे छापे, काय म्हणाले अजित पवार ?

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ईडीच्या कारवाईमागे राजकीय रंगाचा संशय असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. केंद्रीय यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. मात्र आता जे काही घडतंय, त्याला काही राजकीय रंग आहे का? अशी शंका येत आहे. कुणालाही नाहक त्रास कुणाला देता कामा नये, माझं स्पष्ट मत आहे की, केंद्रात आणि राज्यात कोणाचंही सरकार […]

मुश्रीफांवर ईडीचे छापे, काय म्हणाले अजित पवार ?

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ईडीच्या कारवाईमागे राजकीय रंगाचा संशय असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

केंद्रीय यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. मात्र आता जे काही घडतंय, त्याला काही राजकीय रंग आहे का? अशी शंका येत आहे. कुणालाही नाहक त्रास कुणाला देता कामा नये, माझं स्पष्ट मत आहे की, केंद्रात आणि राज्यात कोणाचंही सरकार असो, राजकीय द्वेषातून कारवाई करू नये,” अनेक नेत्यांवर सूडबुद्धीनं कारवाई केली जात आहे. सत्ताधारी पक्षात गेल्यावर अनेकांना सुखाची झोप लागत असेल, तर अजूनही अनिल देशमुखांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर छापे टाकले. कागल आणि पुण्यात काही ठिकाणांवर ही करावाई झाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत या कारवाईचा निषेध केला आहे. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number