पक्षाला वाचवण्यासाठी थांबलेल्या दोघांना टॅक्सीनं उडवलं

मुंबईमधील वांद्रे वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे. पक्षाला वाचवण्यासाठी कारमधून खाली उतरलेल्या दोघांना टॅक्सीने चिरडले आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अमर मनीष जरीवाला असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जरीवाला […]

पक्षाला वाचवण्यासाठी थांबलेल्या दोघांना टॅक्सीनं उडवलं

मुंबईमधील वांद्रे वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे. पक्षाला वाचवण्यासाठी कारमधून खाली उतरलेल्या दोघांना टॅक्सीने चिरडले आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अमर मनीष जरीवाला असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जरीवाला यांचा चालक श्याम सुंदर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मुंबईच्या वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर एका टॅक्सीने दोघांना धडक दिली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, टॅक्सी चालकानं धडक दिल्यानंतर दोघेही हवेत उडाले आणि दूरवर जाऊन पडले. या अपघातात अमर मनीष जरीवाला यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमर मनीष जरीवाला हे प्राणी आणि पक्ष्यांबाबत अत्यंत संवेदनशील होते आणि हीच संवेदनशीलता त्यांच्यासाठी जीवघेणी ठरली, असे म्हटले जाते. अमर यांनी वांद्रे वरळी सी-लिंकवर आपल्याच कारने जखमी झालेल्या घारीला वाचवण्यासाठी गाडी थांबवली होती. अमर मनीष जरीवाला यांनी त्यांची कार थांबवली आणि चालक श्याम सुंदर कामत यांच्यासह घारीला वाचवण्यासाठी खाली उतरले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number