मविआ सरकारमधील आणखी एक नवीन घोटाळा उघडकीस करणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला होता. त्यामुळे सर्वांच्या नजरा सोमैयांकडे आहेत. मात्र, त्याआधीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक बॉम्ब फोडला आहे. किरीट सोमैयांच्या कुटुंबियांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, किरीट सोमय्यांचा १०० कोटींची टॉयलेट घोटाळा उघड करणार आहे. मीरा भाईंदर मनपा आणि राज्यातील इतरत्र कोटींचा घोटाळा झाला आहे. कुठे-कुठे पैसे खातायत तसेच विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंतची सर्व कागदपत्रे सूपूर्त झाली आहेत. युवा प्रतिष्ठान जी काही एनजीओ ही लोकं चालवत होती, त्यांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे. खोटी बिलं, पर्यावरणाचा ऱ्हास, करून निर्माण केलेले हे सर्व घोटाळे लवकरच बाहेर येईल. तुम्ही मात्र खुलासे करत बसा, असे संजय राऊत म्हणाले.
तसेच किरीट सोमैयांनी विक्रांत निधी घोटाळाप्रकरणी हिशोब द्या. विक्रांत युद्धनौकेचा पैसा कुठे गेला? विक्रांत युद्धनौकेसाठी गोळा केलेल्या पैशाचे काय झाले? असा सवाल, संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.