गुणरत्न सदावर्ते न्यायालयात दाखल; काय होता युक्तिवाद

उच्च न्यायालयाने एसटी संपाबाबत दिलेल्या निर्णयानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. संपकारी कर्माचीर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी धडकले. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात दोन्ही पक्षांनी बाजू माडंली असून सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या […]

गुणरत्न सदावर्ते न्यायालयात दाखल; काय होता युक्तिवाद

उच्च न्यायालयाने एसटी संपाबाबत दिलेल्या निर्णयानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. संपकारी कर्माचीर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी धडकले. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात दोन्ही पक्षांनी बाजू माडंली असून सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. तसेच सदावर्ते यांचे वकिल महेश वासवानी यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीला विरोध केला आहे.

सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तिवाद

गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची कोठडी द्या.

सखोल चौकशीसाठी कोठडी हवी.

सदावर्तेंसह इतर आरोपींवरही गंभीर आरोप.

आरोपींवरील कलमं गंभीर.

पवारांच्या घरावरील हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध.

सदावर्तेंचे वकील महेश वासवानी यांचा युक्तिवाद

सदावर्तेंना तातडीने जामीन द्यावा.

आरोपी तपासाला प्रभावित करणार नाही.

सदावर्तेंच्या वक्तव्यांचा व्हिडिओ सादर करावा.

घरामध्ये घुसू असं सदावर्तें बोलले नाहीत.

सरकारविरुद्ध बोलल्याने सूडबुद्धीने कारवाई.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number