भारताचं परदेश धोरण मजबूत करण्यामध्ये स्वराज यांचा मोलाचा वाटा – नरेंद्र मोदी

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री उशीरा दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. रात्री उशीरा हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात त्यांनी डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद दिला नाही. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या ट्विटर […]

भारताचं परदेश धोरण मजबूत करण्यामध्ये स्वराज यांचा मोलाचा वाटा – नरेंद्र मोदी

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री उशीरा दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. रात्री उशीरा हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात त्यांनी डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद दिला नाही. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, भारतीय राजकारणातलं एक तेजोमय पर्व हरपलं अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मोदींनी वाहिली श्रद्धांजली

नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार सांभाळला. भारताचं परदेश धोरण मजबूत करण्यामध्ये स्वराज यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या कार्यकाळातील केलेल्या अनेक महत्वाच्या कामांबद्दलही मोदींनी यावेळी सर्वांना आठवण करुन दिली.

अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे अतिशय उत्तमरित्या सांभाळली आहेत. त्या वयाच्या 25 व्या वर्षी त्या भारताच्या उत्तरेकडील राज्य असणार्‍या हरयाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री होत्या.

कोणतही पद भुषवत असताना जलद गतीने काम करणं ही त्यांची ओळख होती. त्या भाजपाच्या महत्वाच्या राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. मोदींना टविट्दवारे श्रद्धांजली वाहिली आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number