बीअर बारवर धाड घातल्यावर पोलीस झाले हैराण, कारण…

कुलाबा येथील एका बीअर बारमध्ये पोलिसांनी धाड टाकली. यावेळी त्यांना जे दिसून आलं, ते पाहून पोलीसही हैराण झाले. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार संबंधित बार हा दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ सुरू होता. तेथे काही बेकायदेशीर कृत्यंही सुरू होती. विशेष म्हणजे जे आश्लील चाळे करणारे ग्राहक पकडले गेले त्यात चक्क BMC चे वरिष्ठ कर्मचारी असल्याचं उघड […]

बीअर बारवर धाड घातल्यावर पोलीस झाले हैराण, कारण…

कुलाबा येथील एका बीअर बारमध्ये पोलिसांनी धाड टाकली. यावेळी त्यांना जे दिसून आलं, ते पाहून पोलीसही हैराण झाले. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार संबंधित बार हा दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ सुरू होता. तेथे काही बेकायदेशीर कृत्यंही सुरू होती. विशेष म्हणजे जे आश्लील चाळे करणारे ग्राहक पकडले गेले त्यात चक्क BMC चे वरिष्ठ कर्मचारी असल्याचं उघड झालं.

कसा उघड झाला हा प्रकार?

रात्री सव्वा बाराला देखील सुरू असणाऱ्या एका बारवर पोलिसांनी धाड टाकली.

यावेळी बार सुरू तर होता, आणि ग्राहकांना बीअर पाजण्याचं काम बारचे कर्मचारी करत होते.

त्यावेळी ऑर्केस्ट्रा सुरू होता.

त्याच्या संगीतावर बारबाला नृत्य करत होत्या.

या बारबालांपैकी काहींचे हावभाव अश्लील होतं.

बसलेल्या ग्राहकांपैकी काहीजण या बारबालांवर पैसे उडवत होते.

तर काही ग्राहक या बारबालांसोबत अश्लील चाळे करत होते.

पोलिसांनी हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये शूट केला आणि बारवर धाड टाकल्याचं जाहीर केलं.

पोलिसांनी बारबालांची सुटका केली आणि 9 बार कर्मचारी तर 6 ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

तेव्हा या 6 ग्राहकांपैकी एक जण चक्क महापालिका उपायुक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

हा इसम बारबालेशी अश्लील चाळे करत होता. त्याच्याव्यतिरिक्त चार व्यावसायिक आणि एक वरिष्ठ सरकारी कर्मचारी होते.

या प्रकारामुळे पोलीसही हैराण झाले. मात्र या सर्वांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे BMC चे आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या हजेरीतच हा प्रकार सुरू असल्याचं समोर आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number