भारतात कोरोनाची तिसरी लाट?

राज्यासह देशात कोरोना रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ राज्यासह देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच दुसरीकडे कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन रुग्णदेखील वाढत आहेत. मागील आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या तीन पटीने वाढली आहे. त्यामुळे आता देशात कोरोनाची तिसरी लाट येणार का? अशी शक्यात वर्तवली जात आहे. गेल्या दीड वर्षामध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजवला होता. मात्र […]

भारतात कोरोनाची तिसरी लाट?

राज्यासह देशात कोरोना रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ

राज्यासह देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच दुसरीकडे कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन रुग्णदेखील वाढत आहेत. मागील आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या तीन पटीने वाढली आहे. त्यामुळे आता देशात कोरोनाची तिसरी लाट येणार का? अशी शक्यात वर्तवली जात आहे.

गेल्या दीड वर्षामध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजवला होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोना परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावली होती. परंतु पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत सक्रीय वाढ होत आहे. मागील आठवड्यात महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. मागील आठवड्यात देशात ४१,९८० कोरोना रुग्णांची नोंद झाली तर राज्यात ११ हजार ८७७ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनासह ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटनेसुद्धा चिंता वाढवली असून देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.

महाराष्ट्रात लहान मुलांसाठी लसीकरण मोहिम

आजपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. मुलांच्या लसीकरण मोहिमेसाठी राज्यात ठिकठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आली असून मुंबईत ९ केंद्रांवर मुलांसाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन लसीचा वापर करण्यात येणार असून १५ ते १६ वर्ष असलेल्या शाळकरी मुलांना विनामूल्य लस देण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number