Homeमनीनव वर्षात खिशाला कात्री लागणार, जाणून घ्या काय महागणार?
नव वर्षात खिशाला कात्री लागणार, जाणून घ्या काय महागणार?
नव वर्षाच्या सुरूवातील नागरिकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. १ जानेवारी २०२२पासून जीएसटी संबंधित काही नियमांमध्ये बदल करण्यात येणार असल्यामुळे काही गोष्टींसाठी नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. सरकारच्या जीएसटी नियमांमध्ये बदल होणार असून काही नवे नियम आणले जाणार आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी महाग होणार आहेत. नव वर्षाच्या सुरुवातीलाच ओला-उबेरसह हजार किंमतीहून अधिकचे कपडे महाग […]
नव वर्षाच्या सुरूवातील नागरिकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. १ जानेवारी २०२२पासून जीएसटी संबंधित काही नियमांमध्ये बदल करण्यात येणार असल्यामुळे काही गोष्टींसाठी नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
सरकारच्या जीएसटी नियमांमध्ये बदल होणार असून काही नवे नियम आणले जाणार आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी महाग होणार आहेत. नव वर्षाच्या सुरुवातीलाच ओला-उबेरसह हजार किंमतीहून अधिकचे कपडे महाग होणार आहे.
नव्या वर्षात काय-काय महागणार?
हळदीसाठी ५ टक्के जीएसटी द्यावा लागणार.
चप्पल, बूट, कपडे खरेदी महागणार
विणलेले कापड, सिंथेटिक धागे, ब्लँकेट, तंबू तसेच टेबल क्लॉथ यासारख्या वस्तूंवर जीएसटी दर ५ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढणार
एक हजार रुपयांपर्यंतच्या कपड्यांवरील जीएसटी दर ५ टक्के वरून १२ टक्क्यांपर्यंत वाढणार.
ओला आणि उबेरसारख्या ऍप्सद्वारे बुक केलेल्या ऑटो रिक्षाचा प्रवास आणखी महागणार.
ऑटो बुकिंगवर ५ टक्के जीएसटी लागू होईल.
झोमॅटो, स्विगीसारख्या कंपन्या १ जानेवारीपासून डिलिव्हरीवर ५ टक्के जीएसटी भरतील
यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त कराचा बोजा पडणार नाही
प्रत्येक डिलिव्हरीवर ५ टक्के जीएसटी वाढीव होणार आहे.