बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी महिला आक्रमक

किराणा दुकानात वाईन विकण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य तसेच विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बंडातात्या यांच्या वक्तव्याविरोधात सातारा राष्ट्रवादी महिला आक्रमक झाल्या आहेत. बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे राष्ट्रवादी महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्या विधानाचा निषेध केला […]

बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी महिला आक्रमक

किराणा दुकानात वाईन विकण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य तसेच विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बंडातात्या यांच्या वक्तव्याविरोधात सातारा राष्ट्रवादी महिला आक्रमक झाल्या आहेत.

बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे राष्ट्रवादी महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्या विधानाचा निषेध केला आहे. दरम्यान, त्यांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावर निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादी महिलांनी बंडातात्या यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षांनी बंडातात्या यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल

बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ते अंत्यत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महिलांच्या आत्मसन्माला व प्रतिष्ठेला धक्का पोहचला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच सातारा पोलिसांनी या वक्तव्याबद्दल बंडातात्य कराडकर यांच्यावर कारवाई करावी. याचा अहवाल ४८ तासाच्या आत महिला आयोगास सादर करावा. तसेच बंडातात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा, असा आदेस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number