नाशिक महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. नाशिक मनपाचा २२१९ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठलीही करवाढ न करता मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे.
नाशिक मनपाच्या अर्थसंकल्पात विकासकामांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून प्रत्येक प्रभागात अद्ययावत शाळा उभारण्यात येणार आहे. तसेच अर्थसंकल्पात चार्जिंग स्टेश, वैद्यकीय महाविद्यालय, वेगवेगळ्या पुतळ्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
नाशिकमधील बिटको रुग्णालयात मेडिकल कॉलेज उभारणीसाठी ६५ कोटीर रुपयांची तरतूद
सार्वजनिक बांधकामासाठी ३७८ कोटी रुपयांची तरतूद
पर्यावरण आणि गोदावरी संवर्धनसाठी २८ कोटी ८८ लाखाचा निधी
भावी नगरसेवकांसाठी ८५.९८ कोटींचा निधी
नाशिकमध्ये कोणतीही करवाढ नाही.
नगरसेवक निधीतून ३० लाख वार्षिक निधी कायम
नाशिक शहरबस सेवेसाठी ९० कोटींची तरतूद
१० हजार वृक्ष लागवडीसाठी २१ कोटींची तरतूद
आयटी पार्कसाठी १० कोटींची तरतूद
महापालिका निवडणूकीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी
ई-स्मार्ट स्कूल योजनेसाठी १५ कोटी रुपयांसह शिक्षणासाठी २६ कोटींची तरतूद
शिक्षण योजनेसाठी ड्रोन सर्वेक्षम मॅपिंग करणार
पालिका पर्यावरण पूरक भांडे खरेदी करणार
बांधकाम व्यावसायिकांना इलेक्ट्रिक वाहनचार्जिंग स्टेशन बंधनकारक