कोल्हापूर पोलीस ऍड. सदावर्तेंना ताब्यात घेणार

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील  गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर पुन्हा त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलीस सदावर्तेंवर कारवाई करणार आहेत. दरम्यान, मुंबई न्यायालयाच्या आदेशानंतर सदावर्तेंचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक […]

कोल्हापूर पोलीस ऍड. सदावर्तेंना ताब्यात घेणार

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील  गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर पुन्हा त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलीस सदावर्तेंवर कारवाई करणार आहेत. दरम्यान, मुंबई न्यायालयाच्या आदेशानंतर सदावर्तेंचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध करून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सदावर्तेंनी केला असल्याची तक्रार दिलीप पाटील यांनी केली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. खासदार उदयनराजें भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांच्याबद्दल जनभावना भडकावणारं विधान केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी त्यांना सातारा जिल्हा पोलिसांनी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, सोमवारी त्यांच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपला असून सातारा सत्र न्यायलयाने वकील सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number