साखळी बॉम्बस्फोटाने काबूल हादरले

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील शाळा आणि प्रशिक्षण केंद्रात पाठोपाठ बॉम्बस्फोट झाले आहेत. या घटनेत ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील अब्दुल रहीम शहीद शाळेत झालेल्या स्फोटांची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली असून या घटनेची चौकशी सुरू झाली आहे. काबूलमध्ये प्रशिक्षण केंद्र आणि शाळेवर हल्ला करण्यात आला […]

साखळी बॉम्बस्फोटाने काबूल हादरले

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील शाळा आणि प्रशिक्षण केंद्रात पाठोपाठ बॉम्बस्फोट झाले आहेत. या घटनेत ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील अब्दुल रहीम शहीद शाळेत झालेल्या स्फोटांची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली असून या घटनेची चौकशी सुरू झाली आहे.

काबूलमध्ये प्रशिक्षण केंद्र आणि शाळेवर हल्ला करण्यात आला आहे शिया समुदायाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. या हल्ल्यात ८ मुलांचा मृत्यू झाला आहे.

काबूलमधील दश्त-ए-बरची भागात हा हल्ला झाला. अब्दुर रहीम शाहिद शाळेवर तीन ते पाच आत्मघातकी हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यापैकी दोन बॉम्बचा स्फोट झाला आहे. हा स्फोट झाला तेव्हा अनेक विद्यार्थी वर्गात होते. काबूल पोलिसांचे प्रवक्ते खालिद झद्रान यांनी तीन स्फोटांची पुष्टी केली, परंतु मालमत्तेचे नुकसान आणि स्फोटाबाबत अधिक तपशील सार्वजनिक केला नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number