Video: पोलीसांना शिवीगाळ करतानाचा झोमॅटो गर्लचा व्हिडीओ व्हायरल

वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या एका झोमॅटो गर्लचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नवी मुंबईतील वाशीमधील हा व्हिडीओ आहे. पोलिसांनी नो पार्किंगचा दंड ठोठावल्यामुळे या तरुणीने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अत्यंत अश्लील शिवीगाळ करत अरेरावी केली. नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मध्ये झोमॅटोच्या महिला कर्मचाऱ्याच्या बाईक वर वाशी वाहतूक विभागातर्फे कारवाई करत असताना सदर महिला धावत […]

Video: पोलीसांना शिवीगाळ करतानाचा झोमॅटो गर्लचा व्हिडीओ व्हायरल
वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या एका झोमॅटो गर्लचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नवी मुंबईतील वाशीमधील हा व्हिडीओ आहे. पोलिसांनी नो पार्किंगचा दंड ठोठावल्यामुळे या तरुणीने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अत्यंत अश्लील शिवीगाळ करत अरेरावी केली.

नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मध्ये झोमॅटोच्या महिला कर्मचाऱ्याच्या बाईक वर वाशी वाहतूक विभागातर्फे कारवाई करत असताना सदर महिला धावत आली. पण व्हिडिओ शूटिंग करत असल्याने ती महिला आणखीन भडकली आणि तिने वाहतूक पोलिसांना आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ द्यायला सुरुवात केली. या महिलेला इतर नागरिकांनी जाण्यास सांगितले मात्र नंतर वाशी पोलिसांनी तिला अटक केली. या महिलेवर शासकीय कामात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा दाखल केलाय. या महिलेने चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number