पालघरमध्ये धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. पालघरमध्ये एक तरूण चक्क हातात साप पकडून उड्या मारत आहे. पालघरमधील तरुणाचा हा जीवघेणा खेळ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून सर्प मित्राकंडून संताप व्यक्त होताना दिसत आहे.
पालघरमधील एक तरूण सापासोबत जीवघेणा खेळ खेळत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हा तरूण सापासोबत दोरी उड्या खेळत आहे. मात्र या प्रकरणाबाबत सर्प मित्रांसह नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून पालघरमध्ये या मुलाचा शोध सुरू आहे.
Palghar | 'पालघरमध्ये या मुलावर सुरु आहे शोध' | Marathi News https://t.co/10U2k94KaY #JaiMaharashtraNews #MarathiNews #Maharashtra #Palghar #Video #ViralVideo #SocialMedia #Jumprope #snakes #games — JAI MAHARASHTRA NEWS (@jaimaharashtran) December 16, 2021
वन्यजीव वाचवणे, सापांचे रक्षण करणे असे विविध उपक्रम हाती घेत असताना दुसरीकडे तरुण सापासोबत खेळ करत आहे. त्यामुळे प्राण्यांच्या जीवांशी खेळ करून तरूण स्वत:ची प्रसिद्धी मिळवत आहे. त्यामुळे पालघरमधील या तरुणाला शिक्षा होण्याची मागणी जोर धरत आहे.