Beed Crime: ‘माझ्या बहिणीशी तुझं लग्न…’ आधी चाकूने सपासप वार, मग रॉडने बेदम मारहाण; बीड हादरलं

बीडच्या माजलगावमध्ये प्रेमप्रकरणातून एका तरुणावर चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime: ‘माझ्या बहिणीशी तुझं लग्न…’ आधी चाकूने सपासप वार, मग रॉडने बेदम मारहाण; बीड हादरलं

Beed Crime: बीड जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माजलगाव शहरात घडलेल्या या घटनेत एका तरुणाला भररस्त्यात चाकू आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव शहरातील एका चहाच्या हॉटेलजवळ ही घटना घडली. संजय गायकवाड असे जखमी तरुणाचे नाव असून, प्रेमसंबंधाच्या वादातून त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. तरुणीच्या भावासह चार जणांनी मिळून हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा: Delhi Crime News : कॅब चालकानं डाव साधला! फुगे विकणाऱ्या 10 वर्षांच्या चिमुकलीला फुटपाथवरून उचललं; अत्याचारांनंतर तिला संपवून जंगलात फेकून दिलं

घटना 22 मे रोजी घडली होती. मात्र, आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा हा प्रकार चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये काही तरुण संजय गायकवाड याला घेरून त्याच्यावर हल्ला करत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर आरोपींनी चाकूने वार करत लोखंडी रॉडनेही मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमी तरुणाच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, "माझ्या बहिणीशी संबंध ठेवू नकोस, तिच्याशी तुझे लग्न होऊ देणार नाही," असे म्हणत आरोपींनी संजयला लक्ष्य केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात संजय गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, हात-पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली आहे.

हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी तरुणाला उपचारासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: Crime News: लिव्ह-इन संबंधाला पालकांचा विरोध; समजूत काढायला गेलेल्या आई- वडिलांसह मुलीने प्रियकराच्या मदतीने बहिणीलाही संपवलं

या प्रकरणी संजय गायकवाड यांच्या तक्रारीवरून माजलगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्ल्याच्या कारणांचा आणि आरोपींच्या भूमिकेचा तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजही तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी केज तालुक्यातील टाकळी येथेही एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रेमप्रकरणातून उद्भवणारे वाद आता हिंसक स्वरूप धारण करत असल्याने नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number