मुंबई, ३० जून २०२३, प्रतिनिधी: मुंबईत महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्याचे कारण म्हणजे मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा विनयभंगाची घटना समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवरील ग्रँडरोड स्थानकावर धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २८ जून रोजी ही घटना घडली असून याप्रकरणी आता मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड स्थानकांदरम्यान धावणाऱ्या ट्रेनमध्ये बसलेल्या एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीला लक्ष्य केले. त्यानंतर आरोपी धीम्या गतीने धावणाऱ्या ट्रेनमधून उडी मारून पसार झाला. घाबरलेल्या पीडित तरुणीने त्याच दिवशी पोलिसांकडे धाव न घेता घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ५ दिवसांनी बुधवारी तिने मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.