मतदाराने एका मतपत्रिकेतून व्यक्त केली बेकार तरुणाची आत्मकथा

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद आतापर्यंत आपण विद्यापीठाच्या किंवा बोर्डाच्या उत्तरपत्रिकेत कोणीतरी प्रेमपत्र तर कोणीतरी आपली विवंचना मांडल्याचे ऐकले होते. मात्र, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एका पदवीधराने मतपत्रिकेला एक पत्र जोडून ‘बेकार तरुणांची काय अवस्था आहे’? ‘त्या बेकारांसाठी काही करता येते का बघा’ अशी आर्त विनंती केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सध्या […]

मतदाराने एका मतपत्रिकेतून व्यक्त केली बेकार तरुणाची आत्मकथा

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

आतापर्यंत आपण विद्यापीठाच्या किंवा बोर्डाच्या उत्तरपत्रिकेत कोणीतरी प्रेमपत्र तर कोणीतरी आपली विवंचना मांडल्याचे ऐकले होते. मात्र, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एका पदवीधराने मतपत्रिकेला एक पत्र जोडून ‘बेकार तरुणांची काय अवस्था आहे’? ‘त्या बेकारांसाठी काही करता येते का बघा’ अशी आर्त विनंती केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सध्या सिनेटच्या निवडणूका सुरू आहेत. यातील दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात एका मतदाराने मतपत्रिकेसोबत एक चिठ्ठी जोडली आहे.

या चिठ्ठीमध्ये मतदाराने व्यक्त केलेल्या भावनेतून भीषण बेकारीचे वास्तव समोर आले आहे. अनेकांना नोकरी मिळत नसल्यामुळे लग्नसुद्धा जमत नसल्याचे सांगितलंय.

यामुळे युवकांचे वय खूप पुढे गेले असल्याचे वास्तवही चिठ्ठीमध्ये मांडण्यात आलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number