पैसे परत न केल्याने झाडाला बांधून तरुणाला चोपले, उत्तर प्रदेशमधील धक्कादायक प्रकार

वृत्तसंस्था, उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये चार ते पाच तरुणांनी एका तरुणाला झाडाला बांधून पट्ट्याने आणि काठीने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. हल्लेखोर तरूणांनी आपल्या या अमानुष कृत्याचा व्हिडीओ शूट केलाय. पीडित मुलाने काही पैसे उधार घेतले होते. हे पैसे परत न केल्यानेच धडा शिकवण्याच्या हेतूने ही मारहाण करण्यात आलीय. तरुणाला केलेली मारहाण […]

पैसे परत न केल्याने झाडाला बांधून तरुणाला चोपले, उत्तर प्रदेशमधील धक्कादायक प्रकार

वृत्तसंस्था, उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये चार ते पाच तरुणांनी एका तरुणाला झाडाला बांधून पट्ट्याने आणि काठीने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. हल्लेखोर तरूणांनी आपल्या या अमानुष कृत्याचा व्हिडीओ शूट केलाय.

पीडित मुलाने काही पैसे उधार घेतले होते. हे पैसे परत न केल्यानेच धडा शिकवण्याच्या हेतूने ही मारहाण करण्यात आलीय. तरुणाला केलेली मारहाण इतकी अमानुष आहे, की मारहाणीची दृश्य पाहून अंगावर काटा येतोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number