ताजमहालला भेट देणारे योगी आदित्यनाथ भाजपाचे पहिले मुख्यमंत्री

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   अयोध्या, बुंदेलखंड आणि बनारसनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आग्रा दौ-यावर पोहोचले. भारताच्या इतिहास आणि संस्कृतीत स्थान असलेल्या ताजमहलवरुन सध्या चांगलाच वाद सुरु आहे. ताजमहलला पर्यटनस्थळाच्या यादीतून हटवण्यात आल्यानंतर सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांच्या आग्रा येथील दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले होते.  यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत […]

ताजमहालला भेट देणारे योगी आदित्यनाथ भाजपाचे पहिले मुख्यमंत्री

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

अयोध्या, बुंदेलखंड आणि बनारसनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आग्रा दौ-यावर पोहोचले. भारताच्या इतिहास आणि संस्कृतीत स्थान असलेल्या ताजमहलवरुन सध्या चांगलाच वाद सुरु आहे.

ताजमहलला पर्यटनस्थळाच्या यादीतून हटवण्यात आल्यानंतर सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांच्या आग्रा येथील दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले होते. 

यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवलं आणि साफसफाई केली.

योगी आदित्यनाथ यांनी तोंडावर मास्क लावत, हातात झाडू घेऊन पश्चिम गेटवर साफसफाई केली. ताजमहालला भेट देणारे योगी आदित्यनाथ भाजपाचे पहिले मुख्यमंत्री आहेत.वादग्रस्त विधानानंतर योगी आदित्यनाथांना उपरती झाली का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number