वृत्तसंस्था, नवी दिल्ली
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथे ईव्हीएमचा नवा फुल फॉर्म सांगितला.
ईव्हीएम म्हणजे ‘एव्हरी वोट फॉर मोदी’ असा नवा फुलफॉर्म त्यांनी सांगितला. त्यांच्या या विधानाचाच दाखला देत आता विरोध ईव्हीएम गोंधळाचा विषय आणखी वाढवण्याची शक्यता आहे.
कारण ईव्हीएममधील कोणतेही बटण दाबले की भाजपलाचा मत जाते, असा आरोप विरोधी पक्षातील नेते करत आहेत.
आता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पाहायला मिळाले.