जय महाराष्ट्र न्युज, नाशिक
वाढत्या उष्म्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. उन्हाची कान्हिली दिवसेंदिवस वाढतेय. या दाहक उन्हाचा त्रास मुक्या प्राण्यांनाही होऊ लागला आहे.अशातच मुक्या प्राण्यांनाही पाण्याची गरज भासत असते. हीच गरज ओळखून येवला तालुक्यातील रेंडाळे गावातील युवा शेतकरी प्रवीण आहेर यांनी तहानलेल्या मोरांसाठी व हरणांसाठी आपल्या शेतातच पाण्याची व्यवस्था केली आहे.रेंडाळे गावाच्या परिसरात आजूबाजूला वन परिसर व डोंगर असल्याने उन्हाच्या झळा तीव्र असतात.
त्यामुळे अन्न पाण्याच्या शोधात असलेल्या मोरांसाठी येथील युवा शेतकरी प्रवीण आहेर यांनी स्वतःच्या विहिरीला पाणी कमी असून देखील तहानलेल्या मोरांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. एका पाण्याच्या टाकीत ते रोज सकाळ संध्याकाळ पाणी टाकून या मोर,पक्षी,हरीण अशा वन्यजीवांची तहान भागवतात.या उपक्रमातून त्यांनी समाजापुढे प्राणीमात्रांवर दया करण्याचा एक आदर्श ठेवला आहे.