जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ
कीटकनाशक फवारणीमुळे यवतमाळमध्ये 19 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतकरी मृत्यूप्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे.
याप्रकरणी मनसेने कृषी कार्यालयांमध्ये राडा घातला. यवतमाळच्या कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या. कृषी अधीक्षकांची खुर्चीही कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर फेकली.