यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरात 13 शेतमजुरांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला अखेर ठार करण्यात आलं आहे. टी-1 वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते.
अखेर शुक्रवारी रात्री वन विभागाच्या रेस्क्यू टीमने या नरभक्षक वाघिणीला ठार केलं आहे. या वाघिणीने गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला होता.
नरभक्षक टी-1 वाघीण अखेर ठार
मात्र आता टी-1 वाघिणीच्या 11 महिन्यांच्या 2 बछड्यांना शोधण्याचं आव्हान वन विभागासमोर आहे.