यवतमाळ मध्ये दारू लपवण्यासाठी चक्क देवाऱ्याचा वापर

आता गुन्हेगारही हाय टेक बनत आहेत. यवतमाळ येथील एका गावठी दारू विक्रेत्याने पोलिसांची नजर चुकविण्यासाठी चक्क देव्हाऱ्या खालीच भूमिगत टाके केले. त्यात एक ड्रम ठेवून कुलरमधील पाण्याच्या मोटारीचा वापर करीत त्याने अवैध दारू विक्रीला तंत्रिकतेची जोड दिली. त्याची ही शक्कल बघून पोलिसही क्षणभर स्तब्ध झाले. नेमकं प्रकरण काय? सचिन इंगळे असे या दारू विक्रेत्याचे नाव […]

यवतमाळ मध्ये दारू लपवण्यासाठी चक्क देवाऱ्याचा वापर

आता गुन्हेगारही हाय टेक बनत आहेत. यवतमाळ येथील एका गावठी दारू विक्रेत्याने पोलिसांची नजर चुकविण्यासाठी चक्क देव्हाऱ्या खालीच भूमिगत टाके केले. त्यात एक ड्रम ठेवून कुलरमधील पाण्याच्या मोटारीचा वापर करीत त्याने अवैध दारू विक्रीला तंत्रिकतेची जोड दिली. त्याची ही शक्कल बघून पोलिसही क्षणभर स्तब्ध झाले.

नेमकं प्रकरण काय?

सचिन इंगळे असे या दारू विक्रेत्याचे नाव आहे .तो यवतमाळ जिल्ह्यातील जाम वाकडी येथे अवैधपणे दारू विक्रीचा व्यवसाय करतो. कोणालाही संशय येऊ नये म्हणून सचिनने देवघराच्या खाली एक दारू जमा करण्याकरिता भला मोठा पिंप गाडला.

तो एवढ्यावरच थांबला नाही, दारू काढण्यासाठी वारंवार देव उचलायची पाळी येऊ नये आणि कोणाला संशय येऊ नये यासाठी त्याने चक्क कुलर मध्ये वापरला जाण्याऱ्या वॉटर पंप उपयोगात आणला. या वॉटर पंपला त्याने चक्क इलेक्ट्रिकचा सप्लायही दिला.

गरजेपुरती दारू हवी असली की बटन दाबले की काम झाले . शिवाय या पट्ठ्याने अवैध दारू देवघराच्या खाली असलेल्या पिंपात ओतायची असेल तर त्यासाठी ही वेगळा खास पाईप दिला.

पोलिसांनी त्याच्या घरी कित्येक वेळी धाडीही टाकल्या .पण त्यांना रिकाम्या हाती परत यावे लागत होते . पण यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देवघराखाली तपासणी केली असता सचिन ने लढवलेली अनोखी शक्कल बघावयास मिळाली . ही शक्कल बघता पोलिसही चक्रावले . सध्या सचिन फरार आहे . पोलीस त्याचा तपास करीत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number