यवतमाळ जिल्ह्यात 122 जण कोरोनामुक्त, 59 नव्याने पॉझेटिव्ह तीन मृत्यु

यवतमाळ, दि. 1 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 59 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 122 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळ येथील […]

यवतमाळ जिल्ह्यात 122 जण कोरोनामुक्त, 59 नव्याने पॉझेटिव्ह तीन मृत्यु

यवतमाळ, दि. 1 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 59 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 122 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळ येथील 89 आणि 56 वर्षीय पुरुष, तसेच माहुर तालुक्यातील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. सोमवारी पॉजिटिव आलेल्या 59 जणांमध्ये 37 पुरुष आणि 22 महिला आहेत. यात यवतमाळातील 23 रुग्ण, पुसद येथील 12, पांढरकवडा 6, घाटंजी 5, दिग्रस 3, महागाव 3, मारेगाव 2 , नेर 2, बाभुळगाव 1, वणी 1 आणि 1 इतर रुग्ण आहे.
सोमवारी एकूण 439 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 59 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 380 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 1488 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 17575 झाली आहे. 24 तासात 122 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15622 आहे. तर जिल्ह्यात एकूण 465 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 163746 नमुने पाठविले असून यापैकी 161556 प्राप्त तर 2190 अप्राप्त आहेत. तसेच 143981 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number