यवतमाळ जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित मृत्युसह 57 नव्याने पॉझेटिव्ह 37 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यात 24 तासात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 57 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 37 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मृतकामध्ये यवतमाळ येथील 45 आणि 91 वर्षीय पुरुषांचा […]

यवतमाळ जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित मृत्युसह 57 नव्याने पॉझेटिव्ह 37 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यात 24 तासात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 57 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 37 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

मृतकामध्ये यवतमाळ येथील 45 आणि 91 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.22) एकूण 294 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 57 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 237 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 331 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12334 झाली आहे. 24 तासात 37 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11612 आहे. तर जिल्ह्यात एकूण 391 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 120190 नमुने पाठविले असून यापैकी 119562 प्राप्त तर 628 अप्राप्त आहेत. तसेच 107228 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number