यमाईदेवीचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली आहे. सोलापुरातील मार्डी येथील यमाईदेवी मंदिरात रात्री मोठी चोरी झाली.
चोरट्यांनी देवीच्या अंगावरील दागिने आणि काही रककम लंपास केली आहे.
चोरट्यांनी यमाई देवीच्या अंगावरील 6 तोळे सोने आणि 40 किलो चांदी लंपास केली. तसेच या चोरट्यांनी दानपेटीवरही डल्ला मारला.
दानपेटीतून नक्की किती रककम चोरी करण्यात आली याची माहिती मिळालेली नाही.
सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून घडलेल्या या चोरीच्या प्रकाराचा तपास केला जात आहे. मंदिरामध्येच चोरीचा प्रकार घडल्याने मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.