वृत्तसंस्था, नवी दिल्ली
शाओमीने भारतात नुकताच आपला लेटेस्ट Redmi Y2 लाँच केला होता. आता शाओमी कपंनीने भारतात पुन्हा आपले 4 नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत, मात्र हे प्रोडक्ट्स कंपनीच्या स्मार्टफोन लाइनअपशी संबंधित नसून, या नवीन प्रोडक्ट्समध्ये Mi रोलर बॉल पेन चे फोटो, Mi ट्रॅव्हल यू – शेप पिलो, Mi आय लव Mi टी-शर्ट, Mi Band 2 आणि Mi Band HRX चार्जिंग केबल या गोष्टींचा समावेश आहे.
शाओमीने लाँच केलेले प्रोडक्ट्स ग्राहक शाओमीच्या Mi.com या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकणार आहेत.
शाओमीने लाँच केलेल्या प्रोडक्ट्सची किंमत :
Mi रोलर बॉल पेन – 179 रुपये.
Mi आय लव Mi टी-शर्ट – 399 रुपये.
Mi ट्रॅव्हल यू – शेप पिलो – 999 रुपये.
Mi Band 2 आणि Mi Band HRX चार्जिंग केबल – 129 रुपये.