जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
जनावरांच्या वापरासाठी असलेल्या ऑक्सिटॉसिन इंजेक्शनवर चुकीची माहिती नोंदवून त्याची विक्री मानवी प्रसुती प्रक्रियेसाठी केली जातेय. अशी धक्कादायक माहिती ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईतून पुढे आली आहे. या कारवाईदरम्यान संपूर्ण राज्यातील औषध दुकानांमध्ये अशा प्रकारच्या 52 हजारांहून अधिक इंजेक्शनचा साठा एका कंपनीकडून विक्रीसाठी वितरित झाल्याची बाब समोर आली आहे.
विशेष म्हणजे, ठाण्यातील एका रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या महिला रुग्णांवर या इंजेक्शनचा वापर करण्यात आला असून औषध विक्रीच्या तपशीलातून ही बाब उघड झाली आहे.