राज ठाकरेंना हे आवडेल?

मागील काही दिवसांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत आणि राणा दाम्पत्य यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले होते. मात्र, त्यानंतर संजय राऊत आणि नवनीत राणा दोघेही लडाख सीमेवर सोबत दिसले. संसदेचे संरक्षण समतीचे सदस्य म्हणून दोघेही लडाख दौऱ्यादरम्यान सोबत दिसले. राऊत-राणा यांच्या लडाख दौऱ्यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आले. तर, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी […]

राज ठाकरेंना हे आवडेल?

मागील काही दिवसांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत आणि राणा दाम्पत्य यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले होते. मात्र, त्यानंतर संजय राऊत आणि नवनीत राणा दोघेही लडाख सीमेवर सोबत दिसले. संसदेचे संरक्षण समतीचे सदस्य म्हणून दोघेही लडाख दौऱ्यादरम्यान सोबत दिसले. राऊत-राणा यांच्या लडाख दौऱ्यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आले.

तर, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राऊत आणि राणा लडाखमध्ये सोबत फिरण्यावर टीका केली. ‘खासदार नवनीत राणा आणि संजय राऊत लडाखमध्ये एकत्र फिरत आहेत. त्यामुळे राणा आणि राऊत लडाखमध्ये गोड बोलतात, हे शिवसेनेच्या लोकांना खुपत नाही, असाल सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. ज्यांच्यामुळे राज्यात इतकं मोठं प्रकरण तापलं, त्यांच्यासोबत तुम्ही जेवताय, खांद्यावर हात ठेवून फिरताय. त्यामुळे ह्यांचं हिंदुत्व ढोंगी असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

तसेच, राज ठाकरे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मशिदींवरील भोगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून राज ठाकरेंनी राज्यसरकारवर कडाडून टीका केली. त्यामुळे शिवसेना आणि मनसे आमने-सामने आले. दरम्यान, आता संजय राऊत आणि मनसे नेते वसंत मोरे यांची पुण्यातील भेट समोर आली आहे. पुण्यात लग्नसमारंभात संजय राऊत आणि वसंत मोरे यांची भेट झाली आहे.

संजय राऊत-वसंत मोरे भेट

संजय राऊत आणि वसंत मोरे यांची पुण्यात एका लग्नसमारंभात भेट झाली. यावेळी एकमेकांच्या समोर आल्यानंतर सर्वप्रथम राऊत मोरेंना तात्या म्हणाले. वसंत मोरे यांना वसंत मोरे नाही तर तात्या म्हणून ओळखले जाते, असे राऊत यावेळी म्हणाले. तसेच निघताना संजय राऊतांनी मोरेंना भेटू असेही म्हणाले.

शिवसेना-मनसे आमने-सामने असतानाच शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि मनसे नेते वसंत मोरे यांची पुण्यात भेट झाली. त्यामुळे वसंत मोरे शिवसेनेच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चेला उधाण आले आहे. राऊत आणि राणा दाम्पत्य लडाख दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केली. तर आता संजय राऊत आणि वसंत मोरे यांची भेट झालेली राज ठाकरेंना आवडेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच राऊत-मोरे भेटीवर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number