‘मुख्यमंत्री व्हायला आवडेल’

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या मुलाखतीच्या निमित्ताने अजित पवार यांनी आज विविध विषयावर भाष्य केलं. तसेय यावेळी त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर अजित पवारांनी दिलखुलास उत्तर दिलं. तसेच यावेळी त्यांनी ”2024 ला काय आताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकायला तयार आहे, असं रोखठोक विधानही केलं. गेल्या काही […]

‘मुख्यमंत्री व्हायला आवडेल’

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या मुलाखतीच्या निमित्ताने अजित पवार यांनी आज विविध विषयावर भाष्य केलं. तसेय यावेळी त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर अजित पवारांनी दिलखुलास उत्तर दिलं. तसेच यावेळी त्यांनी ”2024 ला काय आताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकायला तयार आहे, असं रोखठोक विधानही केलं.

गेल्या काही दिवसांपासून विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या अस्पष्ट भूमिकेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्याच्या आगामी राजकारणावर अजित पवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे. रॅपिड फायर राऊंडमध्ये त्यांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर होय मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाचं अजिबात आकर्षण नाही. 2004 ला मुख्यमंत्रीपद मिळेल, एवढे आमदार निवडून आलेले होते. परंतू राजकारणात काही निर्णय घेतले जातात. काँग्रेसनेही त्यावेळी मानसिकता केलेली होती.मात्र, काय घडामोडी घडल्या माहिती नाही. वरिष्ठ पातळीवरून निरोप आला की आपल्याकडे उपमुख्यमंत्री पद राहणार आहे. त्यावेळी विधिमंडळात आमच्या सदस्यांनी आर आर पाटील हे मुख्यमंत्री म्हणून निवड केली होती. त्यामुळे आर आर पाटील मुख्यमंत्री म्हणून दिसले असते. मुख्यंमत्रीपद जर राष्ट्रवादीनं घेतलं असतं तर त्यावेळी ते मुख्यमंत्री झाले असते, पण आम्हाला संधी मिळाली नाही”, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number