तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत

गेल्या काही दिवसांपासून वातावर बदलाचा फटका आता तूर पिकाला बसताना दिसत आहे

तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत

धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर सध्या मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ढगाळ हवामान, अपुरा सूर्यप्रकाश, आणि अनियमित पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

तूर हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक असून, शिरपूर तालुक्यातील शेतकरी या पिकावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली होती. मात्र, या पिकावर वाढलेल्या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. अळीचा नायनाट करण्यासाठी योग्य औषधांची फवारणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते, अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे.

तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा काळ कठीण असून, अशा परिस्थितीत शासकीय मदतीची आवश्यकता आहे. कृषी विभागाच्या वतीने तातडीने मार्गदर्शन व उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, सरकारने आणि शेतकऱ्यांनी समन्वय ठेवून या संकटावर मात करावी, असे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number