जागतिक हास्य दिन स्पेशल : तुम्हाला माहित आहेत का हसण्याचे ‘हे’ फायदे

आज जागतिक हास्य दिन… 1963 मध्ये हार्वे बाल याने हासणारी स्मायली तयार केली होती. सदिच्छा, आनंदी वातावरण, मैत्री यांचं सूचक असलेलं हे चिन्ह जगभरात प्रसिद्ध झालं. अतिवापरामुळे याचा मूळ अर्थ, उद्देश काही वेळा विसरला जाऊ लागला, म्हणून मग 1999 मध्ये हार्वेने ऑक्टोबरचा पहिला शुक्रवार हा ‘स्मायल डे’ म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. तेव्हापासून जगभरात हा हास्यदिन […]

जागतिक हास्य दिन स्पेशल : तुम्हाला माहित आहेत का हसण्याचे ‘हे’ फायदे

आज जागतिक हास्य दिन…
1963 मध्ये हार्वे बाल याने हासणारी स्मायली तयार केली होती. सदिच्छा, आनंदी वातावरण, मैत्री यांचं सूचक असलेलं हे चिन्ह जगभरात प्रसिद्ध झालं. अतिवापरामुळे याचा मूळ अर्थ, उद्देश काही वेळा विसरला जाऊ लागला, म्हणून मग 1999 मध्ये हार्वेने ऑक्टोबरचा पहिला शुक्रवार हा ‘स्मायल डे’ म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. तेव्हापासून जगभरात हा हास्यदिन साजरा केला जातोय.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात माणसाचा निवांतपणा हरवला आहे. आयुष्य जगणे हे ताणतणाव आणि दगदगीचे झाले आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्याचा थेट परिणाम हा आता शारीरिक तसंच मानसिक स्थरावर पोहचला आहे. हे टाळण्याचा साधासरळ उपाय म्हणजे खळखळून हसणं. हसण्याचं महत्त्व समजून देण्यासाठीच जगभर हा दिवस साजरा केला जातो.

विविध लाफ्टर क्लबतर्फे नेहमीच हा संदेश दिला जातो. आज स्माईल डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर ट्रेंड सुरु आहे.

हे आहेत हसण्याचे फायदे

  • मनमुराद आणि मोकळेपणाने हसल्याने शरीरात एंडोर्फिस हार्मोन सक्रिय होतात.
  • खाण्याची इच्छा किंवा लालसा नियंत्रणात राहते.
  • चेहऱ्यावरील स्नायू सक्षम ठेवणे आणि रक्तसंचार वाढवण्यात हसण्याची भूमिका महत्त्वाची असते.
  • चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहतो.
  • आनंदी राहिल्याने शरीराची प्रतिकार क्षमता आणि संसर्गासोबत लढणारी प्रणाली सक्षम होते.
  • विविध संसर्ग आणि अ‍ॅलर्जीच्या प्रभावात येण्यापासून बचाव होतो. त्याचप्रमाणे अनेक आजारांना दूर ठेवण्याची शक्ती मिळते.
  • एकटे राहण्यापेक्षा जे लोक मिळून मिसळून राहतात. ते तीस टक्के जास्त हसतात. यासाठी सदैव मित्रांसोबत राहा. नवे मित्र तयार करा. त्यांच्यासोबत चांगला वेळ व्यतीत करा.
  • एका संशोधनानुसार १० मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी हृदयगती तीव्र होते. तेवढ्या हृदयगतीसाठी एक मिनिट हसणे पुरेसे ठरते.
  • हसत राहिल्याने शरीरातील ऊर्जेच्या स्तरावर चांगला परिणाम होतो. या ऊर्जेमुळे तुम्ही काम किंवा वाचनावर लक्ष केंद्रित करू शकता. तसेच या पद्धतीने कामाची गुणवत्तासुद्धा वाढवता येते.
  • हसमुख राहिल्याने व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात आणि त्याचे वागणे सकारात्मक राहते.
  • हसमुख आणि नेहमी उत्साही राहणाऱ्या व्यक्तीकडे लोक आकर्षित होतात
  • हसल्यामुळे स्टड्ढेस हार्मोन्स कार्टिसोल नियंत्रणात असतो. परिस्थिती कितीही तणावपूर्ण असू द्या. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे डोपामाइन आणि ग्रोथ हार्मोन्सची सक्रियता वाढते.
  • वजन वाढण्यासाठी जास्त खाणे आणि तणाव या गोष्टी जबाबदार असतात.
  • आनंदी आणि हसमुख राहिल्याने तणाव वाढत नाही, त्याप्रमाणे चटपटीत खाण्याची इच्छा होत नाही परिणामी वजन नियंत्रणात राहते.
  • हसल्यामुळे शरीरात एंडोर्फिस हा फील गुड करणारा घटक क्रियाशील झाल्याने विविध भागात होत असलेले दुखणे कमी होते.
  • हा रासायनिक घटक पेन किलरप्रमाणे काम करत असतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number