डोंबिवलीत विश्वविक्रमी बटाटा वडा उपक्रमाला सुरुवात

डोंबिवली जिमखाना येथे डोंबिवलीचे शेफ सत्येंद्र जोग यांनी विश्वविक्रमी बटाटा वडा या उपक्रमाला सुरुवात केली आहे. मराठमोळ्या बटाटा वडा या पदार्थाला जागतिक पातळीवर सन्मान प्राप्त व्हावा. तसेच ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये याची नोंद व्हावी. यासाठी एक दिवसात 25 हजार वडे तळण्याचा मानस यावेळी सत्येंद्र जोग यांचा आहे. डोंबिवलीतील हा उपक्रम आज सकाळी 10 […]

डोंबिवलीत विश्वविक्रमी बटाटा वडा उपक्रमाला सुरुवात

डोंबिवली जिमखाना येथे डोंबिवलीचे शेफ सत्येंद्र जोग यांनी विश्वविक्रमी बटाटा वडा या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

मराठमोळ्या बटाटा वडा या पदार्थाला जागतिक पातळीवर सन्मान प्राप्त व्हावा.

तसेच ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये याची नोंद व्हावी. यासाठी एक दिवसात 25 हजार वडे तळण्याचा मानस यावेळी सत्येंद्र जोग यांचा आहे.

डोंबिवलीतील हा उपक्रम आज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असणार आहे.

डोंबिवलीचा बटाटावडा आणि सत्येंद्र जोशी यांची ओळख संपूर्ण जगभर व्हावी अशी आशा आयोजक राहुल कामत यांनी व्यक्त केली.

सत्येंद्र जोशी यांनी आतापर्यँत साडे 3 हजार वडे तळून पूर्ण केले असून हे तळलेले वडे गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि संस्थांना मोफत वाटण्यात येणार आहे.

यामध्ये वीटभट्टी वर काम करणारी मूळ, रस्त्यावर राहणारे विद्यार्थी, आणि आदिवासी पाड्यातील विद्यार्थी आणि गरजूंना मोफत वाटण्यात येणार आहे.

त्यासाठी या संस्थांनी सत्येंद्र जोग यांचे आभार मानले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number